रत्नेश्वर वारकरी संस्थेतील पाच वर्षाचा मुलगा मृदंग वाजण्यात तरबेज

1 min read

परळी दि.४:- पांगरी (ता.परळी) वैजनाथ येथील अखंड हरिनाम सप्ताहात पुष्प भागवताचार्य हभप जगदीश महाराज सोनवणे यांची सुश्राव्य किर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी किर्तनात मृदंगसाथ करण्यासाठी श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडी येथील पाच वर्षाचा विद्यार्थी ज्ञानेश व सुदर्शन शिंगाडे हा दहा वर्षाचा मुलगा किर्तनात मृदंग वाजवत असताना. पाहून सर्व गावकरी मंडळी कडून संस्थेचे व मुलांचे विशेष कौतुक केले जात आहे. किर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य हभप किशन महाराज कराड, वैजनाथ महाराज पांचाळ, गोवर्धन कराड, बाळासाहेब बडे, सुनील केंद्रे, अविनाश मुंडे, मृदंगाचार्य राधाकिशन मुंडे, वैभव कराड, युवा नेते नागनाथ दादा शिंगाडे व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे