आळे येथील श्री खंडोबा देवस्थान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण उत्साहात संपन्न

1 min read

बेल्हे दि.१:- श्री खंडोबा देवस्थान आळे (ता.जुन्नर) मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक (नागपूर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पहिल्या दिवशी रविवार दि.२८ मूर्तीची व कलशाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ भजन पथक, लेझीम पथक, उंट व घोडे पथक, महिला भजन पथक, देउळकाठी मिरवणून, कलशधारी महिला, पारंपारिक वाद्य आदींची मिरवणूकित सहभाग होता. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी विविध धार्मिक विधी, देवता जलाधीवास, मूर्ती धान्याधीवास दिवस संपन्न झाला व रात्री मार्तंड भैरव जागर गोंधळ पार्टीचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवार दि.३० रोजी दिवसभर धार्मिक विधी व सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्याचे डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या शुभहस्ते अभिषेक संपन्न झाला. रात्री हभप आचार्य वैभव महाराज राक्षे (देहू) यांचे हरिकीर्तन झाले. शेवटच्या दिवशी बुधवारी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. व त्यानंतर ढोक महाराजांचे हरिकीर्तन झाले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने चार दिवस आलेल्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थाच्या वतीने सर्व भाविक देणगीदार अन्नदाते या सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे