म्हाळुंगे पडवळ च्या ठाकरवाडीत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त दहा हजारावर भाविकांची उपस्थिती

1 min read

म्हाळुंगे पडवळ दि.२८:- हुतात्मानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हाळुंगे पडवळ येथील ठाकरवाडी च्या भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील दहा हजारावर भाविकांची गर्दी उसळली होती, सकाळ पासून रात्रीपर्यंत मांडवडहाळे, पालखी मिरवणूक. मानाची काठी, महाप्रसाद शोभेची दारू,ऊषा नारायणगावकर यांचा तमाशा अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. पैपाहुणे म्हाळुंगे ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. खेळणी,खाऊ, घरगुती वस्तू, गिफ्टस, सौंदर्यप्रसाधनांची दुकाने थाटण्यात आली होती ज्याचा यात्रेकरुंनी लाभ घेतला.यात्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट, भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव मा तालुका प्रमुख प्रा अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या
यात्रेची व्यवस्था चंद्रकांत जाधव मा सरपंच,बाळु पारधी. अक्षय काळे, पप्पु काळे, युवराज काळे, विजय जाधव, राहुल जाधव, अरविंद काळे , स्वप्निल मेंगाळ, युवराज गावडे, रामदास दुधाणे, लक्ष्मण जाधव,सागर जाधव, मारुती काळे, सुभाष काळे राहुल काळे यांनी पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे