उंचखडक येथे दोन दिवस श्री खंडेराय यात्रोत्सव व श्री हनुमान जयंती सोहळा
1 min read
राजुरी दि.२२:- उंचखडक (आबाटेक, ता.जुन्नर) येथे श्री खंडेराय यात्रोत्सव व श्री हनुमान जयंती सोहळा सालाबादप्रमाणे या ही वर्षी मोठया उत्सहात साजरा होत आहे. सोमवार दि.२२ व मंगळवार दि.२३ दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.पहिल्या दिवशी सोमवार दि. २२ रोजी पहाटे ०४:०० ते ०६:०० काकडा भजन संपन्न झाले. तर रात्रौ :- ०७:०० ते ०९:०० हरिकिर्तन ह.भ.प.ज्ञानेश्वरीताई कोंडे (शिवजन्मभूमी धामनखेल), रात्रौ :- ०९:०० ते ०९:३० उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्रौ :- ०९:३० ते १०:३० महाप्रसाद (आमटी भाकरी) असणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. २३ रोजी पहाटे :- ०४:३० ते ०६:०० काकडा भजन, सकाळी :- ०७:०० ते ०८:०० अभिषेक, सकाळी :- ०९:०० ते ११:०० मांडव डहाळे.
दुपारी :- ०३:०० ते ०४:०० हळदी कुंकू, सायंकाळी :- ०४:०० ते ०६:०० पारायण, रात्रौ :- ०६:०० ते ०९:०० काठी पालखी मिरवणूक, रात्रौ :- ०९:०० ते ०९:३० तळीभंडारा, रात्रौ :- ०९:३० ते १०:३० महाप्रसाद, रात्रौ :- १०:०० ते ०१:०० कुलस्वामिनी खंडेरायाचे जागरण (गाडी घुंगराची फेम विलास अटक) यांचं कार्यक्रम होईल.