श्री कुलस्वामी खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा यंदा भव्य दिव्य :- अध्यक्ष बाळासाहेब गगे
1 min read
नळवणे दि.२१:- चैत्र पौर्णिमे निमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत, नळवणे गावचे ग्रामदैवत श्रद्धास्थान श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान नळवणे (ता.जुन्नर) येथील यात्रा उत्सव यंदा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे.अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली. मंगळवार दि.२३ ते गुरुवार दि.२५ या कालावधीत यात्रा संपन्न होणार आहे.पहिल्या दिवशी मंगळवार दि.२३ रोजी पहाटे ४ ते ५ श्रीस मंगल स्नान व अभिषेक, ५ ते ७ हनुमान जन्मोत्सव, त्यानंतर ८ ते ११ श्रीची भव्य मिरवणूक, मांडव डहाळे, देवदर्शन व खोबरे भंडाऱ्यांची उधळण होणार आहे.
तसेच सायंकाळी ७ रात्री ११ श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम होईल. रात्री ११ नंतर गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा महाराष्ट्रीयन कलाविष्कार कार्यक्रम होईल.तर बुधवार दि.२४ रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यती असतील यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ४१ हजार.
द्वितीय क्रमांक ३१ हजार, तृतीय क्रमांक २१ हजार तर चतुर्थ क्रमांक ११ हजार रुपयांचे असणार आहे. तर तिसऱ्या दिवशी गुरुवार दि.२५ रोजी दुपारी साडेतीन ते सहा या वेळेत जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.
यंदा तीन दिवस श्रद्धापूर्वक ,भव्य दिव्य स्वरूपात यात्रा संपन्न होत असून महाराष्ट्र मधून असंख्य भाविक श्री कुलस्वामीचा कुलाचार करण्यासाठी व श्री च्या दर्शनासाठी येणार असून. त्यानिमित्ताने देवस्थानने भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय,वाहने पार्किंग व्यवस्था ,दर्शन रांग, सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच खाजगी सुरक्षा व्यवस्था व आळे फाटा पोलीस स्टेशन ने देखील यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला आहे. या निमित्ताने बैलगाडा शर्यती, मनोरंजनाचा कार्यक्रम , कुस्त्यांचा आखाडा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
तरी सर्व भाविकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन नळवणे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे व ग्रामस्थांनी केली आहे.