महाशिवरात्री निमित्त श्री नागेश्वर महादेव मंदिरात उत्सव
1 min read
बेल्हे दि.११:- सालाबाद प्रमाणे याही वर्षी बेल्हे (ता.जुन्नर) येथे महाशिवरात्री निमीत्त श्री नागेश्वर महादेव यांचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. सकाळी महादेवाचा अभिषेक करण्यात आला व नंतर सकाळ पासून रात्री ९ वाजेपर्यंत आलेल्या भाविक भक्तांना खिचडी व केळीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
सकाळी अभिषेक झाल्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. भाविकांनी दर्शनाला गर्दि केली होती. मंदीराला फुलांची आकर्षक सजावट करन्यात आली होती. याकामी शिवाजी डुंबरे, संतोष शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, स्वप्निल संभेराव, राजू शिवले, सोमा गुंजाळ यांनी परीश्रम घेवुन उत्सव यशस्वी केला.