४२ मंदिरांचे बोरी गाव; जुन्नर तालुक्यात सर्वाधिक मंदिरे असणारे गाव

1 min read

बोरी दि.५:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेती समृध्द गाव म्हणून बोरीगावाची ओळख आहे. जुन्नर तालुक्यात विविध देवदेवतांची सर्वाधिक मंदिर असलेले गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.बोरीत तब्बल ४२ पेक्षा जास्त मंदिर आहेत. त्यातील बहुतांश मंदिरे पुरातन काळातील आहेत.

बोरी गावात बुवासाहेब मंदिर,बायजावाई मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री विश्वेश्वर मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर, श्री राम मंदिरे दोन, श्री मुक्ताबाई मंदिर, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, मुक्ताई मंदिर, गोसावी बाबा मंदिर, बोलावाबा मंदिर, श्री जनाई मंदिर, श्री कमलामाता मंदिर, पीरबाबा मंदिर, श्री चारंगेश्वर मंदिर, मोठा पीर मंदिर, छोटा पीर मंदिर.

जालिंदर बाबा मंदिर, पीर बाबा मंदिर, धावडे पीरबाबा मंदिर, श्री बिरोबा महाराज मंदिर, पीरबाबा मंदिर, मोडके मळा श्री म्हसेश्वराची दोन मंदिरे, कुंभारमळा श्री चारंगेश्वर मंदिर, डेरेमळा मुंजाबाबा मंदिर, जाधव मळा सदबाबा मंदिर, धोंडबाबा मंदिर, कोरडे मळा नानाबाबा मंदिर, कोरडेमळा दावजीबाबा मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, वीर साहेब मंदिर, हनुमान मंदिर.

धावजी बाबा मंदिर, सावता माळी मंदिर, चारंग बाबा मंदिर, मुंजा बाबा मंदिर,शनी मंदिर, श्री गणपती मंदिर आदी मंदिरे आहेत.बोरी गाव हे पौराणिक गाव असून, ऐतिहासिक जुनी बाजारपेठ तसेच नगर ते जुन्नरमधील मोठी बाजारपेठ आहे. इंग्रजांच्या काळात मास्टर प्लॅन करून वसवलेलं हे गाव आहे. गावात कोणत्याही चौकात उभं राहिलं तरी संपूर्ण गाव दिसतं. गावातील सगळे रस्ते सरळ आहेत.

नदीकिनारी अनेक दगडी अवजारे पुरातन काळातील दगडी भांडी, हस्तिदंत, अवजारे येथे पाहावयास मिळत आहेत. या गावात रेडामुख असून, श्रीज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंड बोरीमार्गे आळंदीला गेल्याची आख्यायिका सांगितली जाते.

दरम्यान, गावात असलेली बहुतांशी मंदिरे शंभर वर्षांपेक्षा जुनी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सर्व जातींचे लोक येथे वास्तव्यास असून गावची सुमारे ६ हजार लोकसंख्या आहे.

बोरीगावात काशी अर्धेपीठ, पुरातन हेमाडपंती व विविध देवी देवतांची ४२ मंदिरे आहेत.गावात पेशवेकालीन वाडे आहेत.गावच्या वैभवात भर टाकणारी कुकडी नदी वाहत आहे.”

वनिता डेरे सरपंच, बोरी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे