काही तासातच बदलले नगर महापालिकेचे आयुक्त; यशवंत डांगे नवे आयुक्त
1 min readअहील्यानगर दि.१०:- महापालिकेच्या आयुक्तपदी काही तासांपूर्वी झालेली बदली प्रक्रिया रद्द करून आता नव्याने पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नगर महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
नगर महापालिकेमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अमरावतीचे आयुक्त देविदास पवार यांची नगर येथे नियुक्ती करण्यात आली होती.
या विषयाला काही तास उलटले नाही, तोच आता राज्य सरकारने नव्याने बदलीची प्रक्रिया केली आहे. या पदावर पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. या अगोदर डांगे यांनी नगर महापालिकेमध्ये दोन वर्ष उपायुक्त पदाचा पदभार पाहिला होता.
त्यामुळे त्यांना नगरच्या प्रश्नांची जाण आणि अनुभव आहे. आता त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते लवकरच पदभार स्वीकारतील.