अहिल्यानगर महापालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार

1 min read

अहिल्यानगर दि.१०:- गेल्या काही दिवसांपासून नगर महापालिकेच्या आयुक्त पदावर काेणाची नियुक्ती हाेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. मात्र, अखेर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त देविदास पवार यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. याबाबत नुकतेच नगरविकास विभागाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी पवार यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी २७ जून रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून ते पसार झाले आहे. त्यानंतर नगर विकास विभागाने अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्त पदाचा प्रभारी पदभार सोपवला होता. मात्र, अखेर देविदास पवार यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे