समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये रोड सेफ्टी क्लब स्थापन
1 min read
बेल्हे दि.६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतीच वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (आयडीटीआर) पुणे येथे सध्या प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले संजय ससाणे, बालभारतीचे माजी विशेषाधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे आणि आर.बी.माने यांनी सदिच्छा भेट दिली.
विद्यार्थ्यांमध्ये रोड सेफ्टी संदर्भात जागृती निर्माण व्हावी तसेच रस्त्यावर होणारे अपघात टाळण्याकरता तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत यावेळी आयडीटीआर चे प्राचार्य संजय ससाणे यांनी केले.समर्थ शैक्षणिक संकुलातील विविध विभागांची पाहणी करत विविध ट्रेनिंग सेंटर मध्ये असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची देखील पाहणी केली.टाटा मोटर्स चे विभागीय प्रशिक्षण कौशल्य विकास केंद्र,टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम त्याचप्रमाणे समर्थ शैक्षणिक संकुलातील भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.
रस्ता अपघात होऊ नये म्हणून टू व्हीलर,फोर व्हीलर गाडी चालवताना तसेच वाहतुकीचे नियम आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करणे व स्वतः प्रथमता अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे असे संजय ससाणे म्हणाले.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन यांच्या सहकार्यातून संजयजी ससाणे,बालभारतीचे माजी विशेषाधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे आणि आर.बी.माने यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे,रोड सेफ्टी क्लब ची स्थापना करण्यात आली.
ही जनजागृती मोहीम पुढे चालवण्यासाठी प्रत्येक विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये रोड सेफ्टी क्लब असणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी संजयजी ससाणे यांनी केले.बालभारतीचे माजी विशेषाधिकारी डॉ.अजयकुमार लोळगे यांनी नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा या विषयी मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षा विषयक साक्षरता आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.अजयकुमार लोळगे यांनी केले.बालभारतीने इयत्ता नववी आणि दहावीसाठी प्रकाशित केलेले “नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा” हे पुस्तक समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना भेट दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.सतीश गुजर,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले.प्रा.संजय कंधारे,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,उपप्राचार्य विष्णू मापारी,मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा.अमोल खतोडे, आयटीआयचे निदेशक महेंद्र न्हावी,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.