नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर:डॉ.मंगेश वाघमारे
1 min readबेल्हे दि.५:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथे नुकतेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. मंगेश वाघमारे यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चालू शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. या नव्या धोरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आलेला आहे. यामध्ये मल्टिपल एन्ट्री व मल्टिपल एक्झिटची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच आंतरविद्याशास्त्र अभ्यासक्रम शिकवण्याची संधीही या शैक्षणिक धोरणाने मिळणार आहे. शिक्षणाने विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्व गुण विकास होईल, विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास होईल अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.आपल्या भारत देशाला ज्ञान महासत्ता बनवायचे असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवला पाहिजे.त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. मंगेश वाघमारे यांनी यावेळी बेल्हे येथील आयोजित कार्यशाळेत व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी संपर्क अभियानांतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जाणीव व जागृती व्हावी या उद्देशाने या विशेष कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर मंगेश वाघमारे यांनी उपस्थित विद्यार्थी पालक व शिक्षकांशी चर्चात्मक संवाद साधला.बारावी मधील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत झालेल्या बदलासंदर्भात तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या नवीन संधी कशा उपलब्ध होतील याबाबत डॉ.मंगेश वाघमारे यांनी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, प्रा.गणेश बोरचटे,प्रा.निलेश गावडे, प्रा.प्रशांत काशीद यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप,एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ.शिरीष गवळी. अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.सतीश गुजर, डॉ.महेश भास्कर, डॉ रुस्तुम दराडे, प्रा.शशिकांत ताजणे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भोर यांनी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उत्तम शेलार यांनी तर आभार अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. सतीश गुजर यांनी मानले.