शिष्यवृत्ती परीक्षेत श्री बेल्हेश्वर विद्या मंदिराचे ४ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले

1 min read

बेल्हे दि.५:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी) परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊ शेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे २१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले असून. त्यापैकी चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने श्री बेल्हेश्वर विद्यामंदिराने जुन्नर तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजित अभंग यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणेःराज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थीःराज्य गुणवत्ता यादी १३ वा क्रमांकः वाघ प्रतिक नितीन (२६६ गुण )राज्य गुणवत्ता यादी १५ वा क्रमांकः मुळूक निवेदिता नितीन (२६४ गुण)राज्य गुणवत्ता यादी २३ वा क्रमांकः गुंजाळ रोहन बाळासाहेब (२५६ गुण) राज्य गुणवत्ता यादी २५ वा क्रमांकः कोकणे कार्तिकी शरद (२५४ गुण).

जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थीःपिंगट धीरज भीमसेन (२५२ गुण) फापाळे देवेंद्र दीपक (२५० गुण) दाते ऋषिकेश रंगनाथ (२४६ गुण)गुंजाळ धीरज सुधाकर (२३० गुण) विश्वासराव प्रणाली महेश (२२४ गुण) रोकडे अविष्कार रवींद्र (२२० गुण) खोमणे आवेश दिलीप (२०८ गुण) गुंजाळ अथर्व ज्ञानेश्वर (२०८ गुण). मटाले आदर्श विलास (२०० गुण) दरेकर कार्तिकी संदीप (१९८ गुण) पाबळे श्रुती देवराम (१९६ गुण) शिंदे श्रावणी स्वप्निल (१९४ गुण) माळवदकर संस्कृती दत्तात्रय (१९४ गुण) खिलारी शर्वरी शांताराम (१९२ गुण) औटी अविष्कार दिनेश (१८८ गुण) गुंजाळ ओम अजय (१८८ गुण).

या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विकास गोसावी, नितीन मुळूक, विठ्ठल पांडे, कोमल कोल्हे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक तसेच पालकांचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ तसेच बेल्हे व बेल्हे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे