पिकअप चोरी करणारी टोळी आळेफाटा पोलीसांकडून जेरबंद

1 min read

आळेफाटा दि.१:-आळे (ता.जुन्नर ) गावच्या हद्दीत रहात असलेले दादासाहेब सुखदेव बहिरट यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे महिंद्रा कंपनीची मॅक्स पिकअप गाडी क्रमांक एम.एच १४ ए. झेड ३५८६ ही लॉक करून पार्कीग केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दि.४ जुन रोजी दाखल करण्यात आली होती. सदर गुन्हयाचे गांर्भाय लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी पोलीस अंमलदार यांची गुन्हे शोध पथक बनवून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा व गुन्हयातील चोरीस गेलेल्या मॅक्स पिकअप गाडीचा गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून शोध घेत असताना, नमुद गुन्हे शोध पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. की सदर गुन्हयातील वाहन हे अभिजीत संतोष खताळ रा. धांदरफळ ता. संगमनेर जि. अहमदनगर व त्याचा विधीसंघर्षीत बालक यांनी चोरी केले असल्याची अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने या अनुषंघाने सदरचे पोलीस पथक हे तात्काळ सदर ठिकाणी जावून अभिजीत संतोष खताळ यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंघाने चौकशी केली.असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक याच्यासाह केला असल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आळेफाटा पोलीस स्टेशन कडील गुन्हयातील महिंद्रा कंपनीची मॅक्स पिकअप गाडी कमांक एम.एच १४ ए. झेड ३५८६ हे वाहन जप्त करण्यात येवून. तसेच या व्यक्तीरिक्त, माळवडगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर व ठाणगाव ता. सिन्नर जि. नाशिक येथून चोरी केलेले ०२ पिकअप वाहनही जप्त करण्यात आली आहेत. अशी एकुण १०,००,०००/- (दहा लाख रूपये किंमतीची तीन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी, रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या. सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवलदार विनोद गायकवाड, पंकज पारखे,आमित पोळ, अमित माळुंजे, नविन अरगडे, हनुमंत ढोबळे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे