मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी चा १०० टक्के निकाल

1 min read

कर्जुले हर्या दि.१:- कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) च्या निकालाची परंपरा कायम राहिली आहे. डिप्लोमा इन फार्मसी चा द्वितीय वर्षाचा १०० % निकाल लागला आहे.

सदर विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक गडदे भागवत (८०.०० %), द्वितीय क्रमांक वांढेकर भाग्यश्री (७९.००%), तृतीय क्रमांक बडे मिनाक्षी (७८.००%) , चतुर्थ क्रमांक गुंड श्रुतिका (७८.००%), पाचवा क्रमांक गुंजाळ प्रतिक्षा (७७.९१%) यांनी क्रमांक पटकावला आहे.

तसेच ४० विद्यार्थ्यांनी ७०% हून अधिक मार्क मिळविले आहे. गेली ८ वर्षाहून १००% निकालाची परंपरा कायम राहण्यासाठी सर्व शिक्षकांनी अथक प्रयत्न घेतले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मिरा आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दिपक आहेर, सचिव किरण आहेर,

खजिनदार बाळासाहेब उंडे, सर्व संचालक, सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक , ग्रामस्थ, पालक यांनी या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे