वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप

1 min read

निमगाव सावा दि.२:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध उद्योजक व स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय गणपत गाडगे यांनी आपली मुलगी आराध्या हिच्या 9 व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊवाटप केले.

दरवर्षी मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून शालेय मुलांसाठी शालेय वस्तू देत असतात. या वर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भास्कर गाडगे यांनी विजय गाडगे यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. तसेच विजय गाडगे यांनी यावर्षी शाळेतील मुलांना खेळण्यासाठी लागणारे साहित्य देण्याचे आश्वासन दिले आहे.मागील अनेक वर्षे विजय गणपत गाडगे हे मुलीच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवत असतात. यापूर्वी देखील त्यांनी शाळेला भरीव आर्थिक मदत केलेली आहे. मुलांची शैक्षणिक सहल, ई- लर्निंग साठी टीव्ही संच, बाल आनंद मेळावा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शाळेला बांधकामासाठी देणगी इत्यादी कामे केलेली आहेत.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे. सरपंच किशोर घोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान पटेल, ह. भ.प. विजय महाराज खाडे,परेश घोडे, परशुराम लगड, सलीम मिस्त्री चंदा गाडगे, गणेश गाडगे, सनी उनवणे,साजिद पटेल,संदीप थोरात,प्रकाश तट्टू, शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफणे, उपशिक्षिका जयश्री जावळे, शारदा मटाले, संतोष साळुंके, प्रशाली डुकरे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक संतोष साळुंके यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफने यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे