विद्या निकेतन डी. फार्मसी कॉलेजच्या उज्वल निकालाची परंपरा कायम
1 min read
बोटा दि.३०:- बोटा (ता.संगमनेर) येथील विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट संचलित विद्या निकेतन औषध निर्माणशास्त्र (डी.फार्मसी) अभासक्रमाच्या महाराष्ट्र तंत्रशिक्षणमंडळाने उन्हाळी 2024 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले.
द्वितीय वर्ष डी.फार्मसी १०० % निकाल लागला असून, कु. मंडलिक दीक्षा दौलत ८३.८२.% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, मधे राधिका नाथा ८३.६४%, गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच शिंदे अवधूत दत्तात्रय ८२.७३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला,
प्रथम वर्षामध्ये चत्तर ज्योती मोहन ८१.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, मंडलिक संस्कृती रमेश ७८.२०%, गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. घाटकर समिधा प्रकाश ७६.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. तेजस शिवराम पाचपुते यांनी दिली.
संस्थेचे उपाध्यक्ष रामदास पोखरकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.