श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे बेल्हे व गुंजाळमळ्यात स्वागत
1 min read
बेल्हे दि.२७:-श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे बेल्हे (ता.जुन्नर) गुरुवार दि. २७ रोजी गावात आगमन झाले. ग्रामस्थांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत केले नंतर पालखी शिवाजी भगवान डुंबरे यांच्याकडे घरी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली. तेथे डुंबरे परिवारा तर्फे स्वागत करून वारकऱ्यांना अल्पोपहार दिला.
मसाला दुध व चिक्कीचा अस्वाद घेऊन पालखी विठ्ठल नामाच्या घोषात पंढरपुर मार्गस्थ झाली. श्री बाबाजी चैतन्य महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री क्षेत्र उत्तमापुर हे आत्ताचे ओतूर येथे श्री बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी असुन येथुन हा पालखी सोहळा पंढरपुर वारी साठी निघतो.
यंदा पेरन्या न झाल्यामुळे वारकऱ्यांची संख्या जरा कमी आहे. थोडा फरक पुरूष व स्रियांची संख्या जवळ जवळ समान आहे. श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे हे ६४ वे वर्ष आहे शके १९४४ रोजी ह.भ.प.वै.सहादू बाबा वायकर महाराज यांनी केली अशा या महान संत तुकाराम महाराज यांच्या गुरुचा हा पालखी सोहळा बेल्हे नगरीत आला.
त्यामुळे बेल्हे नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमली. तसेच गुंजाळमळा येथील ह.भ.प. कै.भागोजी विठोबा गुंजाळ यांच्या घरी दुपारी भोजन व विश्रांती साठी आली. महापूजा ह भ प विशाल महाराज हाडवळे यांचे प्रवचन व त्या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.