नारायणगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजित “रक्तदान शिबिरात ४२५ दात्यांनी केले रक्तदान; रक्तदात्यास मोफत पाच लाखांचा विमा, हेल्मेट व प्रमाणपत्र
1 min read
नारायणगाव दि.२८:- नारायणगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजित “रक्तदान शिबिरात नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत ४२५ दात्यांनी केले रक्तदान केले. या वेळी रक्तदात्यास मोफत पाच लाखांचा विमा, हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पोलीस, दिव्यांग नागरिक, महिला, युवक, शासकीय अधिकारी,फॉरेस्ट अधिकारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार, राजकीय पदाधिकारी असे ४२५ रक्तदात्यांनी घेतला रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता.
नारायणगाव पोलीस स्टेशन,डॉ.कथे डायग्नोस्टीक नारायणगाव,पुना ब्लड सेंटर नारायणगाव, जीवन मल्टिस्पेशालीटी हॉस्पीटल नारायणगाव यांनी स्तुत्य उपक्रम राबवला.नारायणगाव पोलीस स्टेशन मिटींग हॉल येथे सामाजिक बांधिलकी म्हणून आज दिनांक 27/06/2024 रोजी सकाळी 9/00 वा.ते सायं 5/00 वा.चे सुमा. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभाग रवींद्र चौधर , स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव.
व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिरासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.एका दिवसात 425 रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा इतिहास रचला आहे.
सदर रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन कडून नागरिकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती मृत्यु 5 लाख रुपयापर्यंत मोफत अपघाती विमा तसेच सर्व रक्तदात्यास नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येकी 1 हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सदर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे सदर रक्तदान शिबिरात रियाज हमीदभाई मोमीन रा-वारूळवाडी तालुका-जुन्नर जिल्हा-पुणे यांनी सहकुटुंब सहपरिवार रक्तदान केले तसेच, दिव्यांग नागरिक, महिला.
शालेय विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, शासकीय अधिकारी यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सदर रक्तदान शिबिरासाठी अमित बेनके, आशा बुचके, संतोष नाना खैरे, माऊली खंडागळे, योगेश उर्फ बाबू पाटे,सुरज वाजगे, आकाश बोरकर, अविनाश डावखर,गणेश वाजगे.
सचिन थोरवे, प्रमोद खांडगे, योगेश तोडकरी,डॉ. पंजाबराव कथे,डॉ. पिंकी कथे,डॉ. लहु खैरे, रमेश बिराजदार, आकाश जगताप, अमोल नरवडे, संतोष साठे, भास्कर गाडगे, दादामिया पटेल, ज्ञानेश्वर शिंदे, निवृत्ती काळे,सर्व पोलीस पाटील,नारायणगाव हद्दीतील सर्व पत्रकार बंधू ,सरपंच.
महिला दक्षता समितीच्या सदस्या,ग्राम सुरक्षा दल,कथे डायग्नोस्टिक सेंटर व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टीम चे पदाधिकारी, पुना ब्लड सेंटर स्टाफ,न्यू इंडिया इन्शुरन्स चे सर्व अधिकारी कर्मचारी,तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पोलीस उपनिरक्षक विनोद धुर्वे, सनिल धनवे, जगदीश पाटील व सर्व अंमलदार यांचे विशेष सहकार्य लाभले.