जुन्नर तालुक्यातील नदी, नाले, बंधारे, पाझर तलाव कोरडेठाण; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

1 min read

आणे दि.२५:- जुन्नर तालुक्यात बंधारे,नदी, नाले, पाझर तलाव कोरडेठाण असून पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नाही. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यात ३५ ते ४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. आणे पठारावर अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासकीय टँकर तसेच सामाजिक उंचखडक राजुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते पंकज कणसे यांच्याद्वारे आणे पठारावर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अद्यापही येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रोहिणी संपून मृग नक्षत्र ही कोरडे ठाण गेले असून तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झालेला नाही. काही भागातील नांगरट केलेल्या शेतीतील ढेकळे देखील फुटलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती काही भागात वळवाचा पाऊस झाला परंतु बऱ्याच ठिकाणी अद्याप पाऊस समाधानकारक पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्ष सध्या पावसाकडे लागलेले आहे. जुन्नर तालुक्यातील कालदरे, कुमशेत, गोळेगाव, लेण्याद्री, जुन्नर, कुसुर, पारुंडे, वडज, बुचकेवाडी, दातखिळेवाडी, बेल्हे,आणे पठार, राजुरी, उंचखडक, साकोरी, निमगाव सावा, तांबेवाडी, आळे, लवणवाडी, या भागात अत्यल्प पाऊस झालेला आहे. आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला तर उर्वरित राहिलेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. पावसाने गुंगारा दिला तर शेतकऱ्यांना अडचणी वाढणार आहेत.या वर्षी च्या कडक उन्हामुळे या शेतातील विहिरीत तसेच कुपनलिका काही अपवाद ओघळता कोरड्या ठाण आहेत. तालुक्यात काही ठिकाणी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली वारुळवाडी, नारायणगाव, मांजरवाडी, १४ नंबर, भोरवाडी,कांदळी, वडगाव, आळेफाटा,पिंपरी पेंढार, पिंपळवंडी, काळवाडी उंब्रज या भागामध्ये वळवाचा बऱ्यापैकी पाऊस झालाय परंतु तो पेरणीसाठी पुरेसा व समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका. असे आवाहन कृषी विभागाने केला आहे. आणे, पठारावरील नावाने भागात थोडेफार प्रमाणात चांगला पाऊस झालाय तर आणे, पेमदारा, शिंदेवाडी, गुळुंचवाडी या भागातील सर्व पाझर तलाव बांधले कोरडे कोरडे ठाण आहेत. आणे पठारावरील ५० ते ६० टक्के क्षेत्रात शेतकऱ्यांनी कमी पावसावर पेरणी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे