रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल व सहाय्यक क्लब रोटरी क्लब निगडी यांच्या माध्यमातून आठ अंगणवाड्यांना शैक्षणीसाहित्य वाटप

1 min read

बेल्हे दि.२४:- रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल आणि सहाय्यक क्लब रोटरी क्लब निगडी यांच्या सहयोगाने, इनोव्हेटिव्ह सर्विस प्रोजेक्ट अंतर्गत जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील २, खोडद २, जाधववाडी २, वाळूंजवाडी १, तसेच नांदूरखंदरमल येथे १ अशा आठ अंगणवाड्यांमध्ये विविध सुविधा शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले. या सुविधांमध्ये रंगीत आणि बोलक्या भिंती, कपाट, इनडोर खेळणी, व्हाईट बोर्ड, ई-लर्निंग टीव्ही संच यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून, अंगणवाड्यांमध्ये शिकणे अधिक आकर्षक आणि प्रभावी होईल, तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यक ठरेल असे मत रोटरी क्लब ने व्यक्त केले.

१) बोलक्या भिंती: – रंगीत चित्रे आणि शैक्षणिक माहिती असलेल्या भिंती, ज्यामुळे मुलांना शिकण्यात अधिक रस निर्माण होतो.२)कपाट:- शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि अन्य वस्तू साठवण्यासाठी सुसज्ज कपाट.३) इंदोर खेळणी:- मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त खेळणी. ४) व्हाईट बोर्ड:- शिक्षिकांना शिकवण्यासाठी आणि मुलांना लिहिण्याची सवय लावण्यासाठी व्हाईट बोर्ड. ६) ई-लर्निंग टीव्ही संच:- डिजिटल शिक्षणाच्या सुविधेसाठी ई-लर्निंग टीव्ही संच. या सर्व सुविधांमुळे अंगणवाड्यांमध्ये शिकणे अधिक प्रभावी आणि आनंददायी होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे