मीना शाखा कालव्या पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न; पाण्याचे आवर्तन नियोजन उत्तम
1 min read
पारगाव दि.२४:- मीना शाखा कालव्या वरील सर्व २८ पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्याची बैठक सोमवार दि.२४ पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील ग्रामसंसद कार्यालयात मीना शाखा कालव्याचे अध्यक्ष तथा घोड व कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.
मीना शाखा कालव्यावरील सर्व संस्थाचे कामकाज अतिशय उत्तम पद्धतीने सुरु असून २०१९ पासुन आजपर्यंत पाण्याचे आवर्तन नियोजन अतिशय उत्तम पद्धतीने केल्या बद्दल कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांचे सर्व संस्था पदाधिकऱ्यानी शतशः आभार व्यक्त केले.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मीना शाखा कालव्यावर वितरिका स्थरिय पाणी वापर संस्था त्वरीत सुरू होत असुन त्या अनुशंगाने आवश्यक त्या बाबीची पुर्तता करण्यासाठी सर्व आवश्यक ती माहिती सुभाष झिंजाड यांनी सर्व उपस्थित संस्था पदाधिकाऱ्याना दिली.
येत्या ८ दिवसात वितरिका स्थरिय पाणी वापर संस्था संचालक मंडळाची परिपुर्ण यादी कार्यकारी अभियंता यांना देण्याचे सर्वानुमते ठरले.अध्यक्षिय भाषणात प्रकाश वायसे यांनी मीना शाखा कालव्या वरील सर्व २८ पाणी वापर संस्थासाठी गेल्या साडेचार वर्षात केलेल्या कामाचे विवरण व संस्थाची झालेली प्रगती यावर आपले विचार मांडले.
यावेळी टाकळी हाजी, जांबुत, शिरोली मधील सर्व पाणी वापर संस्थाचे चेअरमन, संचालक, सभासद, शेतकरी व शाखा कर्यचारी उपस्थित होते.धोंडीभाऊ भोर , ज्ञानेश्वर उंडे, रखमा निचित, संपत पानमंद, संदिप आदक, रोहीदास मुसळे, कैलास पवार यांनी आपले विचार मांडले. संस्थेचे सचिव पाडुरंग डुकरे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.