जुन्नर तालुक्यात ३० टक्के पेरण्या; सोयाबीन कडे शेतकऱ्यांचा कल
1 min readआणे दि.१९:- जुन्नर तालुक्यात कमी – जास्त प्रमाणात पाऊस असून काही काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात एकूण ३० टक्के खरीप पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.तालुक्याच्या पूर्व भागात तसेच आणे पठारावर जुन महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला परंतु या पावसाने बंधाऱ्यामध्ये, पाझर तलाव, धरण यामधे पाणी साठा झाला नाही. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साठवणुक होत नाही. शेतीला पेरणीसाठी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा जोर सुरू ठेवला आहे.
आणे पठारावर ५० ते ६० टक्के पेरणी पूर्ण झाली असून सोयाबीन जास्त प्रमाणात पेरले आल्याची माहिती रोहिदास शिंदे यांनी दिली. जुन्नर तालुक्याच्या इतर पूर्व भागात २५ ते ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी शेतामध्ये पेरणीसाठी पुरेसा वापसा नाही असेही परिस्थितीत दिसत आहे. सकीध्या तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व तलाव बंधारे कोरडे ठाण आहेत. बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमुग, मूग, उडीद आदी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तर ऊस लागवड जोरात सुरू आहे.
“जुन्नर तालुक्यात ४३ मिमी पाऊस झाला असून सरासरी ३७ टक्के पाऊस झाला आहे.३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेतात चांगली ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. तालुक्यात सोयाबीनची पेरणी दरवर्षी साधारण १३ हजार ५०० हेक्टरवर होत असते. सोयाबीन फिरण्यासाठी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करू नये तसेच खत व बियाणे या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.”
गणेश भोसले, जुन्नर तालुका कृषी अधिकारी