शेतकऱ्यांनो आता कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार
1 min read
पुणे दि.१४:- लोकसभा निवडणुकीत पराभवाचे कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्या संदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले आहेत. त्यामुळे आता कांद्याचे दर थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहेत.
कांद्याला बाजार समितीपेक्षा कमी दर नाफेड आणि एनसीसीएफ देत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच कांदा प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत देखील महायुतीला फटका बसला होता. केंद्र सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी होते. याआधी कांद्याचे दर एनसीसीएफ आणि नाफेडकडून ठरवले जात होते. जोपर्यंत नाफेड बाजार समितीत कांदा खरेदी करणार नाही, तोपर्यंत व्यापारी आणि नाफेडमध्ये स्पर्धा होणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळणार नसल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे.