शेतकऱ्यांना मृग नक्षत्र पावसाची प्रतीक्षा
1 min read
पुणे दि.९:- पुणे शहरात शनिवारी जोरदार पाऊस झाला परंतु ग्रामीण भागात पावसाने दडी मारलेली दिसून येत आहे. शेतीची मशागत करून आता मृग नक्षत्र पावसाची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत आहेत. शेतकरी बांधवांसमोर मागील वर्षभरात प्रत्येक हंगामातील पिकांच्या उत्पादनातून शेतातील पेरणीचा खर्चसुद्धा निघालेला नाही. आता खरीप हंगामातील पेरणीस बाजारपेठमध्ये सुधारित बियाणे आणि खत विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
खरीप हंगामातील पेरणीसाठी मृग नक्षत्र ७ जून रोजी लागले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.जून महिन्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी बांधवांकडून खरीप हंगामातील पेरणी वेळेत होण्यासाठी शेतीची मशागत आणि बी-बियाणे.
खत खरेदी शेतकरी बांधवांकडून करण्यात येते. खरीप हंगामातील उत्पादित मालावरच वर्षभरातील कुटुंबातील उदरनिर्वाह, शिक्षण आणि पुढील रब्बी हंगामातील पेरणीचा खर्च या सर्व बाबींवर खरीप हंगामातील उत्पादित मालावर अवलंबून राहणार आहेत.
तरी खरीप हंगामातील पेरणीस शेतकरी बांधवास मुबलक बी-बियाणे आणि खतसाठा उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी कृषी विभागाकडून दखल घेण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.