बियाणे, खते, कीटकनाशके चढ्या भावाने विक्री होत असेल तर
1 min read
मुंबई दि.९:- खत – बियाणे विक्री करणारी केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील, चढ्या भावाने विक्री होत असेल, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ती खालील व्हाट्सऍप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी;
त्यावर शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने खालील व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे. +91 9822446655