गाळपास आलेल्या ऊसाला अंतिम दर ५००० रुपये द्या:- शेतकरी संघटना

1 min read

ओझर दि.८:- विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर आंबेगाव ता.जुन्नर जि.पुणे सन २०२३/२०२४ ला गाळपास आलेल्या ऊसाला अंतिम दर ५००० रुपये द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

सन २०२३/२०२४ ला गाळपास आलेल्या ऊसाला माळेगाव कारखान्याचा साखर उतारा ११.४७% ऊस दर ३२०० रुपये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा ११.४६% ऊस दर २९००रुपये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा ११.६३% परंतु ऊस दर २७०० रुपये उर्वरित ३०० रुपये फरक बिल तात्काळ काढावे.शेतकऱ्यांकडून सतत विचारणा होत आहे की विघ्नहर करखाना ऊसाची FRP देत नाही. वरील कारणांमुळे शेतकरी संघटना जाहीर करत आहे की कारखान्याच्या गेटवर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे.जर कारखाना संचालक मंडळाने लक्ष दिले नाही तर.. नंतर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष संचालक मंडळ यांना सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की कारखान्याने गाळपास आलेल्या उसाची एफआरपी जाहीर करावी व इतर कारखान्याच्या बरोबरीने फरक ३०० रुपयेचे ऊस बिल तात्काळ उस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करावे. अन्यथा शेतकरी संघटनांच्या तीव्र आंदोलनाला कारखान्याला सामोरे जावे लागेल. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.सत्यशीलदादा शेरकर यांच्याबरोबर एक दीड तास उस दरासंदर्भात साधक-बाधक चर्चा झाली.खरिप पेरणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फरकाचे बिल देण्यात येईल असे देखील आश्वासन चेअरमन यांनी दिले आहे.व अंतिम दर जास्तीत जास्त देण्याचा देखील दरवर्षीप्रमाणे प्रयत्न श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना करणार आहे असे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये जर श्री.विघ्नहर कारखान्याने फरकाचे बिल काढले नाही तर सर्व संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे देखील शेतकरी संघटना प्रतिनिधींनी निवेदन देताना चेअरमन सत्यशील शेरकर यांना सांगितले आहे.या वेळी जुन्नर तालुक्यातील विविध शेतकरी संघटना प्रतिनिधी डॉ.गणपत डुंबरे कार्याध्यक्ष-शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, राजेंद्र ढोमसे, राष्ट्रीयअध्यक्ष-शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, रमेश शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष-सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. प्रमोद खांडगे पाटील जिल्हाध्यक्ष पुणे-अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना., प्रवीण डोंगरे सचिव अखिल भारतीय शेतकरी संघटना जुन्नर, एकनाथ शिंदे, प्रकाश ढमाने, ज्ञानेश्वर डोके, राहुल वायकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे