बोरी बुद्रूक च्या महिलेने केली ड्रोन द्वारे ऊसाची फवारणी

1 min read

बोरी दि.१:- बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील पुष्पा अमोल कोरडे यांनी आयटीसी मिशन’ सुनहरा कल ‘ घोड नदी जलसंसाधन व्यवस्थापन प्रकल्प, डेवलोपमेंट सपोर्ट सेंटर, नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथील dronacharya ट्रेनिंग सेंटर मध्ये DGCA मान्यता प्राप्त dron pilot चे प्रशिक्षण घेतले. त्या नंतर कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजने मधून अमोल कोरडे यांना ड्रोन मंजूर झाल्या नंतर याचा शुभारंभ त्यांच्या शेतातील ऊस फवारणीने करण्यात आला. या प्रकल्पा अंतर्गत जुन्नर मधील ३ महिलांनी व महाराष्ट्रतील १० महिलांनी ड्रोन चे प्रशिक्षण घेतले.

ड्रोन च्या वापरा मुळे विद्रव्य खते व आऊषदे यांची बचत होते, वेळ वाचतो (१० मिनिटात १ एकर शेतीची फवारणी), मनुष्यबळ कमी लागते. भविष्यात याचा जास्तीतजास्त वापर होणार असून त्या मुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. महिलांना यात योग्य संधी असून त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. मारूती ड्रोन चे विश्वजित मोरे व डीलर कामटे ऑटोमोटिव चे मुजावर यांनी ड्रोन उडवून शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमास आयटीसी चे मनीष सक्सेना, सायली कदम, सूरज गुप्ता, कृषी विभागाच्या सुजाता खेडकय, प्रशिक्षण घेतलेले मनिषा जगताप, सारिका चिंचवडे, बाबाजी बांगर, संपत चिंचवडे, सागर जाधव उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी महिलांनी त्यांना संधी दिल्या बाबत सर्वांचे आभार मानले. कृषी खात्याचे जिल्हा कृषी अधीक्षक काचाले , उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाल्याचे अमोल कोरडे यांनी सांगितले. आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना बिबट्या प्रवान भागात या द्वारे योग्य दरात सेवा उपलब्ध झाल्याने मोठी सोय होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे