एक महिन्याच्या मेहनतीने शेतकरी मालामाल १२ लाखाला विकली तीन एकर ची कोथिंबीर

1 min read

जुन्नर दि.३०:- अतोनात कष्ट, योग्य व्यवस्थापन, निसर्गाची साथ, योग्य वेळी उपलब्ध झालेले भांडवल, प्रारब्ध आणि बाजारभावाने दिलेली साथ या सगळ्या गोष्टींचा संगम शेतकऱ्याला मिळाला की त्याच्या मेहनतीची किंमत त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही.

याची प्रचिती बल्लाळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील शेतकरी आशिष पांडुरंग काफरे यांना आली. शेतीची मशागत करून २४ एप्रिल २०२४ रोजी असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये धन्याचे उत्पन्न घेण्याचे ठरले व ३०० किलो धना पेर केली.बी,खत, औषध फवारणी, मजुरी असा एकूण दीड लाख रुपये उत्पादन खर्च झाला. वीज टाईम टेबल त्रासदायक असल्याकारणाने तुषार सिंचन च्या साहाय्याने रात्र पाळी करून पाण्याचे नियोजन केले.

वेळीच केलेली तणनाशक फवारणी नंतर खुरपणी योग्य कीड नियंत्रण याच्या जोरावर उत्कृष्ट अशा आंध्रा जातीच्या धन्याची उत्तम शेती केली. सध्या कोथिंबिरीला असलेले चांगले बाजार भाव असल्याचा फायदा शेतकऱ्याला झाला.

आणि तीन एकरची कोथिंबीर १२ लाखाला विक्रमी भावात जागेवर विकली गेली. आशिष काफरे यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले.असून योग्य नियोजन व मेहनत यांच्या जोरावर शेतकरी महिन्यात लखपती झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे