बाजरीला तब्बल तीन फुटांचे कणसे; बाजरीचे तीनपट उत्पादन वाढणार

1 min read

जुन्नर दि.२४:- जुन्नर तालुक्यातील कुरण गावामध्ये मध्ये गणेश गव्हाणे या शेतकऱ्यांनी तुर्की प्रजाती बाजरी आपल्या शेतात पिकवली आहे. साधारणतः तीन फुट लांबी चे कणीस या बाजरीच्या पिकाला आले आहे. यांची स्वतः नर्सरी असून त्यांनी बारामती कृषी प्रदर्शनातून हे बियाणे आणले होते. त्यांनी प्रात्यक्षिक स्वःतच्या प्रयोग केला आहे. अगदी तीन फुटाच बाजरीच कणीस आहे. निश्चितच तिप्पटीने उत्पन्न वाढेल. आपली गावठी बाजरी साधरण त्याचं बारीक कणीस असतं.गव्हाणे हे शेती मध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. नर्सरी, फळबाग, ऊसाच्या नवीन प्रजाती, त्यात कल्पकतेने जैविक खते स्वतः तयार करून वापरतात. तसेच कुरण गावातील शेतकऱ्यांना चालता बोलता शेती विषयक माहिती देत असतात. त्यांच्या या नवीन प्रयोगाची जुन्नर तालुक्यात चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे