आळेफाटा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक; मार्केटच्या बाहेर कांदाच कांदा
1 min read
आळेफाटा दि.७:- आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवार दि.७ रोजी कांद्याच्या ३२ हजार ८२१ पिशवींची हंगामातील विक्रमी आवक झाली. कांदा मार्केट मध्ये जागा नसल्या मुळे मार्केट च्या बाहेर हजारो पिशव्या टाकण्यात आल्या होत्या.
एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला २०० रूपये बाजारभाव मिळाला आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती संजय काळे, संचालक प्रितम काळे, सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांणी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १८० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास १६० ते १८० बाजारभाव मिळाला.
तीन नंबर गोल्टी कांद्यास १२० ते १५० रूपये बाजारभाव मिळला तर चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास दहा किलोस ५० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला. दरम्यान येथील बाजार समीतीत या आठवड्यात कांद्याची मोठी आवक झालेली असताना देखील
बाजारभावात किलोला ५ ते ६ रूपये बाजारभावात वाढ झाली आहे माहीती संतोष कु-हाडे, विजय कु-हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदिप कोरडे यांनी दिली.