बोरीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार
1 min readआळेफाटा दि.१८:- बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील पाडेकर वस्ती वरील अशोक गणपत पाडेकर यांच्या घरालगत असणाऱ्या गोठ्यात प्रवेश करून दोन बिबट्याने चार शेळ्यांवर हल्ला केला यामध्ये तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून एक शेळी जखमी झाली आहे.
ही घटना रात्रीच्या एकच्या सुमारास घडली असून सुमारे अकरा फूट जाळीच्या वरून दोन बिबट्या आत प्रवेश करून तीन शेळ्या ठार केल्या तर एक शेळी जखमी झाली आहे. वन विभागाचे वनपाल भानुदास शिंदे, महेश जगदाने व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.
पाडेकर वस्तीवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेत वन विभागाकडून या ठिकाणी तात्काळ उपाय योजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.