बिबट्या जवळ आल्यावर वाजणार अलाराम; जुन्नर वनविभागामार्फत पूर्वसूचना यंत्र कार्यान्वित

1 min read

बोरी दि.१९:- बोरी साईनगर येथे (ता.जुन्नर) येथे जुन्नर वनविभागामार्फत कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित वन्यप्राणी पूर्वसूचना यंत्र (AI base wild animal detection alarm system) बसवण्यात आले आहे. सदर यंत्रणेमुळे आजूबाजूच्या परिसरात बिबट वन्यप्राणी दिसून आल्यास वनाधिकारी व रेस्क्यू मेंबर यांना संदेश पाठवला जातो. तसेच सदर यंत्रणेवर लावलेल्या हुटर चा आवाज होतो. व त्यामुळे सदर परिसरातील लोकांना आवाज जाऊन ते सावध होतात. या सोबतच वनाधिकारी यांना गेलेल्या संदेशामुळे सदर परीसरात जन जागृती साठी व बिबट रेस्क्यू साठी टीम पाठवली जाते. सदर यंत्रणेने काम मंगळवार दि .१८ पासून सुरु केले असून त्यामुळे सदर परीसरातील लोकांना बिबट असल्याची आगाऊ माहिती मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे