बेल्ह्याचा सोमवारी जनावरांचा बाजार बंद:- जिल्हा अधिकारी डॉ.सुहास दिवसे
1 min read
बेल्हे दि.१६:- गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथील सोमवार दिनांक १७ चा बैल व शेळी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला आहे.तर भाजीबाजार सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती बेल्हे बाजार प्रमुख शैलेश नाईकवाडी यांनी दिली. आदेशात म्हटले आहे की,
अन्वये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी प्रस्ताव सादर करुन पुणे ग्रामीण जिल्हयात दिनांक १७/०६/२०२४ रोजी बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायदयानुसार दुध देणाऱ्या गायी, म्हैस, बैल, रेडा, पारडी, वळु अशा गोवंश जनावरांची कत्तल व त्यांचे मांस वाहतुक करण्यास बंदी आहे.
बकरी ईद सणाचे कत्तलसाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात सोलापूर रोड, अहमदनगर रोड, सासवड रोड व नाशिक रोडने वाहतूक होऊन सदरच्या वाहतुकीस काही संघटनांकडून विरोध होऊन अटकाव होण्याची आणि त्याप्रसंगी सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी बकरी ईदचे दिवशी गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील जनावरांचा बाजार दि. १७/०६/२०२४ रोजी बंद ठेवण्याबाबत विनंती केलेली आहे. त्यास अनुसरुन वाचले क्र. २ नुसार तहसिलदार जुन्नर यांनी देखील बेल्हा, ता. जुन्नर येथील जनावरांचा बाजार बंद ठेण्याबाबत अहवाल सादर केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, दिनांक १७/०६/२०२४ रोजी साजरा होणारा बकरी ईद हा सण शांततामय व मंगलमय वातावरणात पार पडला जावा, जातीय सलोखा राखला जावा. तसेच पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी.