API अजय गोरड यांची पोलिस निरीक्षक पदावर बढती

1 min read

श्रीगोंदा दि.११:- अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे येथे पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले एपीआय अजय गोरड यांची मुंबई शहर येथे पोलिस निरीक्षक पदावर त्यांची बढती झाली आहे.अजय लक्ष्मण गोरड (रा.बचेरी ता.माळशिरस जिल्हा सोलापूर) यांचे पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण प्राथमिक शाळा बचेरी येथे झाले.पाचवी ते दहावी शिक्षण जवाहरलाल शेतकी विद्यालय पिलीव येथे झाले. आकरावी ,बारावी शिक्षण आटपाडी जिल्हा सांगली येथे झाले आहे.बारावी नंतर बी एस अँग्री ला ॲडमिशन मिळाले परंतु घरची गरीबी परस्थिती मुळे शिक्षण अर्धवट सोडुन सन 2004 मध्ये वयाचे 18 व्या वर्षी अकोला पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. पोलीस खातेमध्ये नोकरी करत करत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये पदवी शिक्षण पुर्ण केले.व पोलीस उपनिरीक्षक(PSI) परीक्षा सन 2010 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी उत्तीर्ण झाले.सुरवातीची अडीच वर्ष नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नोकरी केली. गडचिरोली येथुन Api पदी प्रमोशन होऊन पुणे ग्रामीण येथे बदली झाली. नंतर सातारा, अहमदनगर येथे सेवा बजावली आहे.गोरड यांनी यवत, बारामती शहर, नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण तसेच उंब्रज,कराड शहर पोलीस स्टेशन सातारा व श्रीगोंदा पोलीस स्टेशन अहमदनगर येथे सेवा बजावली आहे.

पोलीस दलामध्ये उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केले बद्दल अजय गोरड यांना केंद्र शासनाचे आंतरिक सुरक्षा पदक, महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील महाराष्ट्रतील सर्वोच्च पदक ‘पोलीस महासंचालक पदक’ सन 2022 मध्ये मिळाले आहे. गडचिरोली, सातारा,पुणे ग्रामीण, अहमदनगर येथे पोलीस दलामध्ये चांगली कामगिरी करून पोलीस दलांचे प्रतिमा वाढवली आहे तसेच गावाचे नाव ही मोठे केले आहे. अजय गोरड यांच्या खडतर यशामध्ये त्यांचे वडील बचेरी गावचे माजी सरपंच लक्ष्मण तात्या गोरड.आई मालती गोरड,पत्नी लतिका गोरड,लहान मुले आयुष व अमिषा चा सिंहांचा वाटा आहे.तसेच त्यांचे भाऊ बहिण,नातेवाईक व मित्र परिवार यांची मोठी साथ लाभली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे