जुन्नर तालुका बिबट मुक्त करा; बिबट मानव संघर्ष मुक्ती समितीची मागणी
1 min read
जुन्नर दि.१०:- जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत अद्याप कायम असून दिवसा,रात्री केव्हांही आणि कुठेही बिबट्यांचे दर्शन सुलभ झाले आहे.काही दिवसांपूर्वी पिंपरी पेंढार,काळवाडी, उंब्रज, पिंपळवंडी, वडगाव कांदळी अशा अनेक गावांमध्ये बिबट्याने मानवी हल्ला करून त्यांना गतप्रान केले. तर काहींना गंभीर जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार बिबट्यांचे हल्ले होऊ लागल्यामुळे तसेच वनविभागाच्या वतीने प्रभावी उपाय योजना राबविण्यात याव्यात आणि तालुक्यातील बिबट संख्या कमी व्हावी म्हणून बहुतांश शेतकरी एकवटले आणि मानव बिबट संघर्ष मुक्ती समितीची स्थापना करण्यात आली.
सदर समितीची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून जुन्नर चे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांना या समितीच्या वतीने नुकतेच बिबट हल्ले रोखण्यासाठी तालुका बिबट मुक्त करा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या बाबत अमोल सातपुते म्हणाले की शासकीय नियमा नुसार बिबटे नियंत्रण करण्यासाठी पाठ पुरावा केंद्र शासन दरबारी चालू असून ज्या ज्या ठिकाणी हल्ले झालेत तेथील संपूर्ण परिसर धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला असून.
येथील बिबटे पकडण्यात यशही आले आहे. अद्यापही बिबट्यांची दहशत असल्यामुळे त्या त्या ठिकाणी पिंजरे लावन्यात आलेले आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.या प्रसंगी समितीचे पदाधिकारी,सदस्य अशोक घोडके.
प्रदीप पिंगट, संदीप गंभीर, कैलास बोडके, नितीन शेलार, अरुण मोरे, भूषण औटी व शेतकरी उपस्थित होते.येत्या 15 जूनला सर्व शाळा चालू होत आहे. वाडी वस्तीवरील शाळांच्या बाजूला पिंजरे लावण्याची सूचना केली आहे तसेच सर्व पालकांनी व शिक्षकांनी मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन बिबट मानव संघर्ष मुक्ती समितीचे संयोजक प्रशांत पाबळे यांनी केली आहे.