जागतिक पर्यावरण दिना निमित्त नारायणगाव वृक्षारोपण

1 min read

नारायणगाव दि.६:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविभाग जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ यांच्या सर्वांच्या सहकार्यांमधून आपदा मित्र सुशांत भुजबळ नारायणगाव पोलीस स्टेशन चे ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य आदित्य डेरे. शंतनु डेरे, सुशील (बॉबी) ढवळे यांच्या संकल्पनेतून वारूळवाडी येथे गणपीर बाबा डोंगर परिसर मध्ये देवस्थानाच्या आजूबाजूला नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांचा हस्ते वड, पिंपळ, आवळा, लिंब, जांभळ, करंज, बहावा, कांचन, आवळा, बांबू, करवंद, अर्जुन साताडा (आयुर्वेदिक झाड).

अशी प्रत्येकी २५ झाडे लावून या ठिकाणी ग्रामपंचायत वारूळवाडी यांनी केलेल्या पाईपलाईन मधून प्रत्येक झाडाला ड्रीपच्या साह्याने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जून महिना चालू असून या महिन्यामध्ये वळवाचे पावसाचे आगमन होत असते. त्या पावसामध्ये लावलेली झाडे ही जगतात वनविभागी यांनी दिलेली. झाडे ही कमी पाण्यावर व उष्ण तापमानात जगत असतात ही झाडे लावण्याकरता मदत म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांचा मार्गदर्शनाखाली वारूळवाडी येथील हॉस्पिटल कर्मचारी व प्राध्यापक मधुरा काळभोर, विद्या गाडगे यांनी झाडे लावण्याकरता मदत केली. जागतिक पर्यावरण दिन निमित्त दरवर्षी या डोंगरावर अशाच प्रकारची झाडांची लागवड वनविभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.याbठिकाणी लावण्यात आलेली झाडे सामाजिक वनीकरण विभाग जुन्नर येडगाव नर्सरी या ठिकाणावरून निशुल्क दिलेली आहेत. याकरता वनविभाग जुन्नर होले यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे