महान योद्धा राणा प्रताप जयंती निमित्त स्वच्छता अभियान

1 min read

पुणे दि.९:- रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियान संपन्न झाला. महान योद्धा राणा प्रताप यांची जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता अभियान -२०२४” हे समीर लॉन्स (सर्व्हिस रोड) रावेत येथे सुनियोजित वेळेत यशस्वी पार पडले.

या अभियानात समविचारी समाजाप्रती, पर्यावरणाप्रती तळमळ असणाऱ्यां संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 300 पेक्षा अधिक सदस्यांनी सकाळी 6.30 वाजता सुनियोजित वेळेत स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग घेऊन दोन कि.मी.परिसर कचरा, प्लास्टिक उचलून साफ सफाई करत स्वच्छ केला.


आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत स्वच्छता अभियानामध्ये विविध पर्यावरणप्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या. आपला परिवाराच्या वतीने मा.क्षेत्रीय आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य सहाय्यक विकास शिरवाळे, आत्माराम जमादार,

हनुमंत जाधव, प्रमिला शिंदे, अनिल तुपे, सुरज कल्याणी, दिपक रिटे आणि सर्व स्वच्छता सहभागी कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार वजा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. या वेळी आपला परिवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.आर शिंदे यांनी प्रास्तविक केले. पर्यावरण रक्षण व संवर्धनाची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे सचिव रो. दिपक सोनवणे, पर्यावरण संचालक रो. आण्णासाहेब मटाले, मेडिकल डायरेक्टर रो डॉ.संतोष मोरे, रो.डॉ. योगेश गाडेकर व खजिनदार रो. केशव काळदाते, तसेच जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, सचिव नवनाथ नलावडे, संघटक दत्ता बोऱ्हाडे, अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष रखमाजी (आण्णासाहेब) मटाले, रामेश्र्वर भोंगाळे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे