पुणे जिल्ह्यात ४३ हजार नोटा तर ९८० टेंडर मतदान
1 min read
पुणे दि.७ :- जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या चारही मतदारसंघांत ४३ हजार मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केल्याचे समोर आले आहे. चारपैकी सर्वाधिक नोटाचा पर्याय मावळ, त्याखालोखाल शिरूर, बारामती आणि पुणे मतदारसंघातील मतदारांनी वापरला आहे. बारामतीत ९ हजार १५१, शिरूरमध्ये ९ हजार ६६१ आणि मावळात १६ हजार ७६० मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदारसंघांत ९८० बनावट (टेंडर) मतदान झाले. एखाद्या मतदाराच्या नावावर तो मतदानाला येण्यापूर्वीच कोणीतरी मतदान करून गेले. असे चारही मतदारसंघांत ९८० मतदारांसोबत प्रकार घडला.