जुन्नर तालुक्यात एस्रो मॅजिका च्या जुनियर सायंटिस्ट ने भरवले अंतराळ प्रदर्शन

1 min read

राजुरी दि.२ :- जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये एस्रो मॅजिका च्या माध्यमातून भारतातील आगळावेगळा स्पेस कॅम्प भरवण्यात आला होता. यात एस्रो ने निवडलेले देशातील विविध राज्यातील ९ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांनी स्पेस सायंटिस्ट होण्यासाठी एस्रो मॅजिका च्या मार्गदर्शन करते. वर्षभर हे विद्यार्थी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतात. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पेस लॅब बनवली होती. या लॅब मध्ये विविध मॉडेल्स प्रदर्शनासाठी मांडण्यात आले होते. एस्रो च्या माध्यमातून बनवलेले रॉकेट्स, यान तसेच चंद्रयान ३ या विद्यार्थ्यांनी येथे बनवले होते. स्पेस सायन्सच्या सर्व संकल्पना या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या होत्या.एस्रो मॅजिका ही पुणे येथील संस्था असून ही अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देते. संस्थेच्या माध्यमातून राजुरीत ४ दिवसांचा स्पेस कॅम्प घेण्यात आला. या देशाच्या काणाकोपऱ्यातील विविध एस्रो मॅजिका चे बाल शास्त्रज्ञ एस्रो मॅजिजाच्या सायंटिस्टच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प सादर केले.ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन SVCET च्या सहकार्याने पार पडले. आपल्या ग्रामीण भागात असे स्तुत्य राष्ट्रीय पातळीवरचे उपक्रम सह्याद्री व्हॅली कॉलेज करत आहे.ह्या स्पेस कॅम्प मध्ये इस्रो मॅजिका संस्थेचे संस्थापक व राष्ट्रपती शाब्बासकी प्राप्त शिक्षणतज्ञ डॉ युवराज लांबोळे, शिक्षणतज्ञ योगेश उंडे, कीर्ती उंडे तसेच शास्त्रज्ञ प्रवीण वाकोडे व इतर रिसर्च सायंटिस्ट श्रेया माने. पूजा कुमारी, सह्याद्री व्हॅली कॉलेज संचालक सचिन चव्हाण, प्राचार्य पी बलराम, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. तसेच सर्वांचे कौतुकास्पद प्रशिक्षण ही पार पडले.यामध्ये थ्री इडियट्स मूवीतील वापरलेली चक्की स्कूटर हे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्याचे निर्माते संशोधक शेख जहांगीर ह्या प्रोग्रॅम मध्ये उपस्थित होते. ज्या ठिकाणी विजेचे सोय नाही तेथेही स्कूटर चक्कीच्या माध्यमातून धान्य देण्याचे काम केले जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे