निमगाव सावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद
1 min read
निमगाव सावा दि.१:- बागवाड़ी, निमगाव सावा (ता.जुन्नर) लक्ष्मण गाडगे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात शनिवार दि.१ रोज़ी पहाटे ५ वाजता बिबट जेरबंद करन्यात वन विभागाला यश आले आहे. हा बिबट नर असून वय ५-६ वर्षे आहे. सदर बिबटयास माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविन्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव सावा येथील बागवाडी, मते मळा, काटे वस्ती येथे बिबट्याची दहशत होती. दोन दिवसापूर्वी गणपत नारायण गाडगे यांच्या घराजवळ पाच फुटाच्या जाळीवरून जाऊन दोन बकरे फस्त केली. ही महिती ग्रमस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची ताबडतोब काळजी घेऊन पंचनामा केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा उपलब्ध करून दिला. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक महेश जगधने यांनी ताबडतोब पिंजरा लावला असता.
अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात बिबट्या पकडण्यात यश आले. याबाबत निमगाव सावा व बागवाडी, मते मळा, काटे वस्ती व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.