जुन्नर तालुक्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या सार्थक तांबेचं आमदार अतुल बेनके कडून कौतुक
1 min read
ओतूर दि.३१:- ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी सार्थक मंगेश तांबे हा ९९.२०% गुण मिळवून जुन्नर तालुक्यात प्रथम आला. त्यानिमित्त गुरुवार दि .३० रोजी ओतूर येथे जाऊन आमदार अतुल बेनके यांनी सार्थकची भेट घेऊन त्याचे कौतुक केले आणि पालकांचे अभिनंदन केले. सार्थकला पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ओतूर आणि परिसर हा शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेला परिसर आहे हेच पुन्हा एकदा सार्थकच्या कामगिरीने सार्थ ठरवलं. चैतन्य विद्यालयाचा यंदाचा निकाल हा ९७% इतका लागला आहे. तालुक्यातील इतर अनेक विद्यालयांनी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे हि अभिमानाची गोष्ट आहे.
स्व. वल्लभ बेनके नेहमी म्हणायचे शिक्षणाने मुलांमध्ये प्रगल्भता येते, स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मुलांना बळ मिळते. शिक्षणाने एक चांगला समाज घडत असतो. जुन्नर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शाळा,
विद्यालये आणि महाविद्यालये कार्यरत आहेत त्यातून अनेक विद्यार्थी आज घडत आहेत याचा मला अभिमान वाटतो असे आमदार बेनके या वेळी म्हणाले.
यावेळी समवेत विशाल तांबे, रवी डुंबरे, सोनल डुंबरे, देविदास तांबे, संतोष तांबे, रामदासशेठ तांबे, अतुल तांबे, विवेक पानसरे, संतोष डुंबरे, स्वर्मिल डुंबरे यांसह इतर सहकारी उपस्थित होते.
तसेच तालुक्यातून द्वितीय क्रमांक श्रावणी गणेश बेलवटे – ९८.२० % (गुरुवर्य रा . प. सबनीस विद्यालय नारायणगाव) तर तृतीय अर्चिता मेघनाथ प्रसाद – ९८.००% (गुरुवर्य रा. प . सबनीस विद्यालय नारायणगाव) याही विद्यार्थांचे अभिनंदन केले.