दुष्काळी आणे पठारवासियांवर आमदार अतुल बेनके यांची जल कृपा
1 min read
आणे दि.२:- आणे पठार सध्या दुष्काळाच्या छळा सहन करत आहे. या भागात पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आणे व परिसरात बेल्हा प्रादेशिक योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने कमी प्रमाणात होत आहे. शासकीय टँकर ने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी वैयक्तिक आणे व परिसर मध्ये २५ हजार लिटर क्षणात असणाऱ्या टँकरने रोज पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचा टँकर सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी आणे गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच प्रियांका प्रशांत दाते, ग्रामपंचायत सदस्य जयराम दाते, प्रियांका दाते, मेहबूब तांबोळी, माजी उपसरपंच भास्कर आहेर, प्रशांत दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
आणे पठारावर सध्या शासकीय टँकर सुरू असून राजुरी उंचखडक गावचे सामाजिक कार्यकर्ते पंकज कणसे यांनी सुद्धा दीड महिन्या पूर्वी या भागात स्व: खर्चातून सुमारे २५ हजार लिटर पाणी क्षमता असणारे टँकर सुरू केले आहे. पाऊस पडेपर्यंत टँकर सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती पंकज कणसे यांनी दिली.