ओतूरच्या चैतन्य विद्यालयाचा सार्थक तांबे ९९.२० टक्के मिळून जुन्नर तालुक्यात प्रथम
1 min read
जुन्नर दि.२८:- दहावीचा जुन्नर तालुक्याचा निकाल ९७.५२ टक्के लागला असून ओतूरच्या चैतन्य विद्यालयाचा सार्थक तांबे ९९.२० टक्के मिळून जुन्नर तालुक्यात प्रथम आला आहे.
तालुक्यात एकूण बसलेल्या ५,०५५ विद्यार्थ्यांपैकी ४,९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत १,६२९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १,८४४ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १,१८५ विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीत २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १२५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
तालुक्यातील एकूण ८९ शाळांपैकी एकूण ४७ शाळांचा निकल १०० टक्के लागला तर २७ विद्यालयाचा निकाल ९५ ते १०० टक्के च्या दरम्यान लागला तर ११ विद्यालयाचा निकाल ९० ते ९५ च्या दरम्यान लागला. तसेच ४ विद्यालयाचा निकाल ८५ ते ९० टक्केच्या दरम्यान लागला.
तालुक्यातील काही प्रमुख शाळा व निकालाची टक्केवारी -शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर ९८.४३ टक्के, चैतन्य विद्यालय ओतूर ९६.९४ टक्के, रा.प. सबनीस विद्यालय नारायणगाव ९७.६७ टक्के, सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी ९४.५४ टक्के, विद्याविकास मंदिर राजुरी ९९.२२ टक्के, सरदार पटेल हायस्कूल आणे १०० टक्के,
ज्ञानमंदिर हायस्कूल आळे ९७.८९ टक्के, अंजुमन हायस्कूल जुन्नर ९६.७७ टक्के, श्री. संभाजी विद्यालय बोरी बु, १०० टक्के, श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज १०० टक्के, श्री. बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे ९७.५१ टक्के, अण्णासाहेब आवटे विद्यालय जुन्नर ९०.७२ टक्के, श्री. छत्रपती हायस्कूल येणेरे १०० टक्के,
कृष्णराव मुंडे विद्यालय जुन्नर ९०.४७ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु. १०० टक्के, श्री. विघ्नहर विद्यालय ओझर १०० टक्के, एम.जी. हायस्कूल आळे १०० टक्के, हिंदमाता विद्यालय वडगाव कांदळी ९८.५७ टक्के, श्री. ब्रम्हनाथ विद्यामंदिर पारुंडे ९६.२९ टक्के.