शवविच्छेदन अहवाला साठी मयताच्या नातेवाईकांची ससे होलपट; आळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कासव गतीने काम
1 min read
आळेफाटा दि.२७:- वैभव शिवाजी वायाळ रा.खामुंडी (ता.जुन्नर) यांचा अपघात होऊन त्यात यांचा मृत्यू झाला होता. आळेफाटा (ता. जुन्नर) येथील आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.१८ एप्रिल रोजी मृत्यू नंतर शवविच्छेदन करण्यात आले. मात्र शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना बऱ्याच तास वाट पाहावीतर लागलीच होती. आता १ महिना उलटून गेला तरी देखील शवविच्छेदन अहवाल अजूनही येथील डॉक्टरांनी पोलिसांना दिला नसल्याने नातेवाईकांनी अनेक वेळा हेलपाटे मारुनही अजूनही काही दिवस लागतील.
असं नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितल्याने नातेवाईकांची मात्र ससे होलपट होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आम्हाला इतर बाबींसाठी शवविच्छेदन अहवाल खूप गरजेचा असल्यामुळे आम्ही वारंवार डॉक्टर यांना संपर्क करून विचारणा करत आहोत.
मात्र डॉक्टरांकडून समाधान कारक उत्तर येत नाही त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी यात लक्ष घालून आमची चाललेली ससे होलपट थांबवावी अशी मागणी करत असल्याचे सांगितले आहे.