अधिवेशनात बिबट्यांचा विषय मांडणार:- आमदार अतुल बेनके, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तातडीने भेट घेणार:- मा. खा. शिवाजी आढळराव पाटील

1 min read

आळेफाटा दि.२६:- वनविभागाने पिंपरी पेंढार येथील शेतक-यांवर जो गुन्हा दाखल केला आहे. तो त्यांच्या पुरता मर्यादीत नसुन संपूर्ण तालुक्यातील जनतेवर गुन्हा दाखल केलेला आहे. ते गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार अतुल बेनके यांनी आळेफाटा या ठिकाणी दिले.

जुन्नर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा मुत्यू झाला असुन वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच बिबट विषयांवरील विविध मागण्यासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे शुक्रवार दि.२४ सकाळी दहा वाजल्यापासुन आळेफाटा येथील चौकात बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.

त्यास पाठिंबा देण्यासाठी आले असता ते बोलत होते. आमदार बेनके म्हणाले की बिबटयांचे माणसांवर दिवसेंदिवस हल्ले वाढतच चालले असुन यावर येत्या अधिवेषणात हा विषय मांडणार आहोत तसेच बिबट विषयी ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार सरकारने करावा व तश्या प्रकारचे आदेश दिले पाहीजे.

माजी आमदार सोनवणे म्हणाले की वन विभागाने गेल्या तीन वर्षात प्रत्येक गावात असलेली वन समीतीची एकही मिटींग घेतलेली नसुन तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेलेला असताना वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट द्यायला आले सुध्दा नाहीत.

तसेच बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा याकरता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची तातडीने भेट घेणार असल्याचं शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी माजी आमदार विलास लांडे , विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर,

जिल्हा परीक्षेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, अंकुश आमले, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक व आळे गावचे सरपंच प्रितम काळे, अनंतराव चौगुले, विकी काकडे, वैभव कोरडे,धनंजय डुंबरे, किशोर वाबळे, बाजीराव लाड, अंकुश सोनवणे, रमेश शिंदे, पिराजी टाकळकर आदी मान्यवर

विविध गावचे सरपंच,उपसरपंच ,ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे