आळेफाटा येथे माजी आमदार शरद सोनवणे यांचं आमरण उपोषण सुरू
1 min read
आळेफाटा दि.२४:- उपवन संरक्षण अधिकारी अमोल सातपुते यांनी बिबट्याच्या समस्येवर शासनाशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नसुन त्यांना जनततेचे काहीही पडलेले नाही व स्वतःच्या संरक्षणासाठी ५० ते ६० पोलीस घेऊन फिरत असतात त्यांना माणसाच्या जीवाची पर्वा नाही. त्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत त्यांच्यामुळे माणसांचा जीव गमावा लागला आहे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकऱ्यावरती जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेतले पाहिजेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही असा कडक माजी आमदार शरद सोनवणे यांनी आळेफाटा या ठिकाणी दिला.
बिबट्याचे माणसांवर दिवसेंदिवस हल्ले वाढतच चालले असुन वनविभागाने यावर कुठल्याही प्रकारे ठोस पावले उचलली तसेच बिबट विषयांवरील विविध मागण्यासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे शुक्रवार दि.२४ सकाळी दहा वाजल्यापासुन बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके,ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सौरभ डोके, वडगाव आनंद गावचे माजी सरपंच प्रदिप देवकर, कोळशाची गावचे माजी सरपंच संजय गाढवे,निलेश शिंदे,दिगंबर घोडेकर,निलेश भुजबळ,बाजीराव कु-हाडे,गणेश गुंजाळ,संतोष घोटने आदी मांण्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सोनवणे म्हणाले की जुन्नर तालुक्यात बिबट्याचे मानवावर तसेच पाळीव प्राण्यांवर दिवसेंदिवस हल्ले वाढतच चालले असुन यामध्ये दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा मुत्यू व पाचहुन अधिक जण गंभीर जखमी झाले असुन वनविभागाने यावर कोणतीही ठोस पावले उचलली नाही.
तर पिंपरी पेंढार या गावात एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व वन अधिकारी यांच्यात झालेल्या वादात काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये जुन्नरचे वनपरिक्षेत्र उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने निलबीत करावे.
शासनाला २०१८/१९ माणिक डोह बिबट निवारा केंद्र जलसंपदाच्या जमिन वन विभागाने संपादीत करावी बिबट निवारा केंद्रात ठेवण्याबाबत खुलासा करणे, जुन्नर, आंबेगाव खेड, शिरूर संवेदनशील बिबट क्षेत्र घोषीत करावी,बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबटयांना अभय अरण्यात पाठवून द्यावे.
उपननसंरक्षक अमोल सातपुते यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.बिबटयाच्या हल्ल्यात दिवसेंदिवस मानव मृत्यूंची संख्यात कमालीची वाढ होत असुन झाली आहे.ज्या ठिकाणी बिबट्याचा थोका नाही अश्या ठिकाणच्या कर्मचा-यांना तालुक्यात आणावे तसेच पिज-यांची संख्या वाढुन ती लवकरात लवकर मिळावे.
धनगर समाज हा भटकणारा समाज आहे त्यांच्या प्रतिक धनगर वाड्यावर आवाजाची बंदूक देण्यात यावी. बिबट मध्ये हल्ला झालेल्या पिडीत पिंपरी पेंढार, पिंपळवंडी उब्रंज, काठवाडी या शेतकऱ्यावर वनखत्याने सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहे. ते तातडीने मागे घेण्यात यावे अश्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण चालु ठेवणार आहोत असे सोनवणे यांनी यावेळी सांगीतले.