नारायणगाव -बोरी महिण्या पासून बंद; प्रवाशांचे हाल

1 min read

बोरी दि.२०:- नारायणगाव आगाराची नारायणगाव -बोरी ही बंद करण्यात आलेली एसटी पुर्ववत सुरू करण्यात यावी , अशी मागणी बोरी (ता.जुन्नर) गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र भोर यांनी केली आहे. नारायणगाव आगाराची अनेक वर्षांपासून सुरू असलेली नारायणगाव -बोरी ही एसटी बस नारायणगाव आगारातून सकाळी ८.३०वाजता व दुपारी ३.३० वाजता सुटत होती. परंतू काही महिन्यांपासून नारायणगाव आगाराच्या मनमानी अधिकारी यांनी सदर एसटी बंद केल्याने यामुळे प्रवाशी व ज्येष्ठ नागरिक. शालेय विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. एकीकडे एसटी प्रशासन एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवित असताना नारायणगाव आगाराच्या मनमानी कारभारामुळे एस टी महामंडळ तोट्यात येत आहे. सदर एसटी बंद केल्याने प्रवासाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सदर एसटीची फेरी हि सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस आळेफाटा मार्गे असल्याने लोकांची मोठी सोय प्रवासाची मोठी सोय झाली होती. तरी सदरील एसटी बस त्वरित सुरू करावी अन्यथा शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोर यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे