आठवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश

1 min read

काळवाडी दि.२०:- काळवाडी, उंब्रज पिंपळवंडी, पिंपरी पेंढार परिसरामध्ये वन विभागाने ३० हून अधिक पिंजरे लावले असून गेल्या १० दिवसांमध्ये आठ बिबटे पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाले आहेत.

सोमवार दि.२० रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास काळवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्याची मादी असून तिचे वय सुमारे चार ते पाच वर्षे असावे असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा आठवा बिबट्या आहे अशी माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.


गेल्या १० दिवसापासून वन विभागाने पकडलेले हे आठही बिबटे माणिकडोह निवारा केंद्रात आहेत. यातील एकही बिबट्या सोडून दिलेला नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे हा आठ वर्षाचा मुलगा बिबट्याने ठार केल्यानंतर त्या ठिकाणी मोठा आक्रोश निर्माण झाला होता.

त्यावेळी पकडलेले बिबटे यापढे सोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी नागरिकांची होती. त्यानुसार उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यापुढे पकडलेले बिबटे सोडून दिले जाणार नाही अशी ग्वाही दिली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे