समर्थ ज्युनियर कॉलेज चा सर्वोत्कृष्ट निकाल; विज्ञान शाखेची कशब मोमीन ९० टक्के गुण मिळून प्रथम
1 min read
बेल्हे दि.२१:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) या विद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून समर्थ ज्युनियर कॉलेज मधील विज्ञान शाखेतील कशब मोमीन ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. साक्षी गुंजाळ ८४.६७ % गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण तर सानिका घोलप ७९.५० % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
पायल दाते हिने ८२.६७ टक्के गुण मिळवून वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेत प्रथम क्रमांक, तेजस बारेकर ७९ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर प्रियांका शिंदे ७८.१७ % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शाखेनुसार विचार करता विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेचा ९८.१४ टक्के लागला आहे.
समर्थ कॉलेज मध्ये ११ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून तर प्रथम श्रेणी मध्ये ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रा.संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा विनोद चौधरी, प्रा.अमोल खामकर, प्रा.संगीता रिठे, प्रा.रोहिणी औटी, प्रा.नूतन पोखरकर, प्रा.ऋतुजा थोरात, प्रा.श्वेता जाधव, प्रा.वैशाली ढाकोळ, प्रा.सोनल कोरडे, प्रा.सुरेखा पटाडे, प्रा.राहुल वाळुंज, प्रा.प्रतिमा औटी, प्रा.नेहा बुगदे, प्रा.सुवर्णा औटी, प्रा.सागर हांडे, प्रा.गणेश बोरचटे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच पी नरसुडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य विभाग प्रमुख यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.