साईसंस्कार क्लासेसचा सीबीएसई चा निकाल १०० टक्के

1 min read

बेल्हे दि.२१:- साईसंस्कार क्लासेस बेल्हे (ता.जुन्नर) येथील इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तो १०० % लागल्याची माहिती क्लासेसचे डायरेक्टर अमर डुकरे यांनी दिली.

साईसंस्कार क्लासेस मध्ये शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला जातो व विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यानुसार मार्गदर्शन केले जाते.

सीबीएसई बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये श्वेता संदीप मटाले हीने 83.20 % गुण मिळवत प्रथम क्रमांक, तन्मय सुरेश गलांडे 77.40% गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर श्रद्धा बाबाजी दिघे हिने 70.20 % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

निशा विश्वासराव बोऱ्हाडे हीने 68.6% आणि कु.दीक्षा अनिल गाडगे हीने 63% मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले.या विद्यार्थ्यांना क्लासेसचे सर्व शिक्षक व पालक वर्गाचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल क्लासेसचे डायरेक्टर अमर डुकरे, प्राचार्या अनुजा डुकरे, कॅम्पस डायरेक्टर सपना शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे